Posts

मैत्री

Image
ऑगस्ट - सप्टेंबर म्हणजे पावसाळ्याचे दिवस दर वर्षीप्रमाणे सर्वांची online admission process होऊन आत्ता सर्वजण कॉलेज मध्ये admission घेण्यासाठी आले होते.शाळेतील मित्र सोडून शाळा सोडून आम्ही आत्ता कॉलेज विश्वात प्रवेश केला होता .कॉलेज चा पहिला दिवस अर्थातच सर्वांचे आई वडील नाहीतर मोठे भाऊ -बहीण त्यांच्या मुलांना घेऊन कॉलेज मध्ये आले होते .कॉलेज च्या पहिल्या दिवशी सर्वांची हुरहूर वाढते .शिक्षक कसे असतील?नवीन मित्र होतील की नाही ? असे अनेक प्रश्न मनात येत असतात .हे आपण सर्वांनी अनुभवलेच असेल . मनात प्रचंड धाकधूक ,पावसाळ्यातही तोंडाला कोरड पडावी असे सगळं वातावरण कॉलेज मध्ये  असत . ही गोष्ट आहे त्या सर्वांची जे एकमेकांसाठी  अगदी अनोळखी असतात पण त्यांच्यातील ऋणानुबंध दिवसेंदिवस वाढत जातात . पहिला दिवस , ज्योतीला ला कॉलेज मध्ये सोडण्यासाठी तिचे वडील आले होते .पहिला दिवस असल्याने कॉलेज ची वेळ 11 ते 2 एवढीच होती .वडील तिला सोडून जातात व घरी कस यायच ? कोणती बस पकडायची हे सांगतात .तरीही सर्वकाही नवीन असल्याने ज्योती थोडी घाबरी घुबरी झालेली असते .तेवढ्यात तिला तिच्या tution क्लास मध्ये...