मैत्री

ऑगस्ट - सप्टेंबर म्हणजे पावसाळ्याचे दिवस दर वर्षीप्रमाणे सर्वांची online admission process होऊन आत्ता सर्वजण कॉलेज मध्ये admission घेण्यासाठी आले होते.शाळेतील मित्र सोडून शाळा सोडून आम्ही आत्ता कॉलेज विश्वात प्रवेश केला होता .कॉलेज चा पहिला दिवस अर्थातच सर्वांचे आई वडील नाहीतर मोठे भाऊ -बहीण त्यांच्या मुलांना घेऊन कॉलेज मध्ये आले होते .कॉलेज च्या पहिल्या दिवशी सर्वांची हुरहूर वाढते .शिक्षक कसे असतील?नवीन मित्र होतील की नाही ? असे अनेक प्रश्न मनात येत असतात .हे आपण सर्वांनी अनुभवलेच असेल . मनात प्रचंड धाकधूक ,पावसाळ्यातही तोंडाला कोरड पडावी असे सगळं वातावरण कॉलेज मध्ये  असत . ही गोष्ट आहे त्या सर्वांची जे एकमेकांसाठी  अगदी अनोळखी असतात पण त्यांच्यातील ऋणानुबंध दिवसेंदिवस वाढत जातात . पहिला दिवस ,
ज्योतीला ला कॉलेज मध्ये सोडण्यासाठी तिचे वडील आले होते .पहिला दिवस असल्याने कॉलेज ची वेळ 11 ते 2 एवढीच होती .वडील तिला सोडून जातात व घरी कस यायच ? कोणती बस पकडायची हे सांगतात .तरीही सर्वकाही नवीन असल्याने ज्योती थोडी घाबरी घुबरी झालेली असते .तेवढ्यात तिला तिच्या tution क्लास मध्ये असलेली ज्ञानू (ज्ञानेश्वरी )दिसते .ज्ञानू पण ज्योती सारखी थोडीशी गडबडलेली .त्या आधीपासून एकमेकींना ओळखत असतात परंतु कधीतरी Hii ,Hello इ. पुरतीच ओळख .
त्या दोघींनाही एकमेकींना पाहून फार हायस वाटलं .त्यांनी पटकन एकमेकींचा हातात हात धरला आणि कॉलेज च्या गेट बाहेर गेल्या .
दुसऱ्या दिवशी पासून त्यांनी त्यांचे number exchange केले . आणि हळूहळू त्यांच्यात स्नेहपूर्व मैत्री झाली .ज्योती science आणि ज्ञानू commerce student त्यामुळे कधी कधी ज्योतीचे practical असले की उशीर व्हायचा पण ज्ञानू तिच्यासाठी ladies room मध्ये बसून राहायची .हळूहळू ज्योतीची त्यांच्या वर्गातील  ऐश्वर्या,रोहन ,अथर्व आणि संचित यांच्याशी मैत्री होते .
ज्ञानू पण त्या सर्वांमध्ये खूप छान प्रकारे मिसळून जाते .ज्योती आणि ज्ञानू खास मैत्रिणी झाल्या .त्या दोघीच इतक्या सोबत असत की एखाद्या दिवशी ज्योती किंवा ज्ञानू नाही आली की शिक्षक देखील विचारायचे काय ग तुझी मैत्रीण अली नाही ? . ऐश्वर्या थोडीशी लाजरी बुजरी होती .ती थोडासच काहीतरी बोलायची 😅.रोहन आणि अथर्व ही दोन हुशार मुले होती .अत्यंत स्वाभिमानी आणि सभ्य मुलं. संचित हा अधून मधून त्यांच्यात असायचा .त्याला ते सर्व shinchan म्हणून हाक मारत😁.हे सर्व science streame मध्ये आणि एकटी ज्ञानू commerce मध्ये तरीही तिला कधीच वेगळ वाटलं नाही .याउलट ती यांच्या वर्गातही जाऊन बसत .त्यांचे chemistry चे शिक्षक फारच हुशार होते . एकेदिवशी ज्योती chemistry practical करत होती व तिच्यासाठी ज्ञानू lab बाहेर थांबली होती ,तिला थांबलेल पाहून chemistry च्या सरांनी नेमकं अथर्वलाच विचारल 😁, सर- ती मुलगी कोण आहे ?
अथर्व - अहो सर ती आपल्याच classroom मध्ये आहे पण बघा ना practical साठी आलीच नाही .तर त्यावर सर ,
सर- हो ना ती तासाला पण नसते. 😁 
म्हणजे त्या सरांना काहीही सांगितलं तरी खर वाटायचं . ज्योतीचे गणित थोडं कच्च असल्याने रोहन तिला log, antilog सोडवून देत असे.सर्वांचं practical झालं की सगळे डोसा खाण्यासाठी आणि चहा घेण्यासाठी गेले .तर तिथे sincere ऐश्वर्या म्हणते इथे अस उघड्यावर खायचं ,रोहन अथर्वकडे पाहतोय ,ज्योती ज्ञानू कडे पाहते आणि संचित भाऊ मोबाईल मध्ये busy .सगळे एकमेकांकडे पाहून हसले .
ऐश्वर्या- तस नााही यार अरे इथं pathogens असतात .
रोहन - अग ऐश्वर्या नको ना biology काढूस इथे 😏.भूक लागली आहे ग .
ऐश्वर्या - मला डोसा नको मी चहा घेेेइल .
 मस्त पैकी सर्वांनी कट डोसा, मसाला डोसा यावर ताव मारला .आणि बस स्थानकाकडे गेले .त्या दिवशीपासून ते सहाजण एकत्र येऊ जाऊ लागले . बस मधल्या अनेक गमतीजमती ते आजही आठवून हसत असतात .conductor काका बस मध्ये गर्दी असली की एकच वाक्य बोलायचे "चला पुढे सरकत राहा पुढे " अथर्व च आडनाव राजीवडे म्हणून ते काका  अस बोलले की लगेच संचित हळूूूच बोलायचा,चला पुढे सरकत राहा पुढे,राजीवडे 😂  अथर्व थोडा हळवा होता .त्याला कोण काय बोललं की तो एकतर रागवायचा नाहीतर रुसायचा तरी .आणि रोहन म्हणजे शांत पण त्याचे कांड फक्त ज्योतीलाच माहिती कारण ज्योती आणि रोहन आत्ता चांगले मित्र झाले होते आणि ते दोघे दिसायला थोडे फार सारखे होते त्यांची मत पण जुळायचे ते मित्र कमी आणि भाऊ - बहीण जास्त झाले .रोहन आणि ज्योती एकमेकांना सगळं काही सांगायचे अगदी secret पण . आणि त्यांना इतरांना चिडवायला पण फार आवडायच . मध्येच अथर्व ची मैत्रीण आदिती असायचीच .तिला सगळे चिमणे म्हणत ,होतीच ती एवढीशीच लहान .😁पण स्वभावाने भारी .
आणि ऐशूची अगदी लहानपणापासूनची मैत्रीण श्रावणी तीही असायची त्या सर्वांत खूपच गोड मुलगी होती .बघता बघता सर्वांची बारावी उजाडली .सर्वजण अभ्यासात असायचे ,प्रत्येकाने आपापल्या भविष्याबद्दल ठरवलं होतं .prelim ,exam या सगळ्यात हे एकमेकांशी तेवढ्याच सलोख्याने राहत .12 thची परीक्षा झाली . ज्योतीला physics चा पेपर इतका अवघड गेला होता की पेपर दिल्यानंतर ती अक्षरशः रडली होती .तिचा भाऊ म्हणजेच रोहन तिला जवळजवळ 1 तास समजावत होता .आणि तिला अस रडताना पाहून अथर्वला फार वाईट वाटलं होतं .त्याने बस मधून जाताना दगडूशेठला नवस बोलला होता .ते त्याने तिला result लागल्यावर सांगितलं कारण ज्योती छान मार्कं घेऊन पास झाली होती .यातून त्याच निरागस मन कळत .रोहन ने पहिला तिचा result पहिला आणि मग स्वतःचा . ते सर्व अगदी छान मार्कांनी पास झाले होते . ते सर्व आत्ता एकत्र एका वर्गात जरी नसले ,वेगळ्या वेगळ्या streams गेले असले तरी ते एकमेकांना समजून घेतात .दररोज फोन होत नसला तरी ते कायम एकमेकांसोबत आहेत.त्यांची मैत्री निस्वार्थी होती आणि आहे .त्यांची मैत्री प्रा'माणिक' आहे.


Comments